निर्बंध असूनही पंजाब मोगामध्ये पराळी जाळल्याची घटना, कृषी विभागाचा कारवाईचा इशारा

पेंढा जाळल्यामुळे निघणाऱ्या धुरात पार्टिक्युलेट मॅटर (पीएम), कार्बन मोनॉक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड यांसारखे हानिकारक प्रदूषक असतात. याचा स्थानिक आणि प्रादेशिक हवामानावर लक्षणीय परिणाम होतो.

पंजाबमध्ये पराळी (पिकांचे अवशेष) जाळण्याच्या घटना थांबत नाहीत. आता पंजाबमधील मोगा जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पराळी जाळल्याचे प्रकरण समोर आले आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी रान पेटवल्यानंतर अग्निशमन दल आणि कृषी विभागाच्या पथकांनी आग विझवली.  शेतकरी त्यांच्या पिकाची कापणी केल्यानंतर, शेतात उरलेले पिकांचे देठ जाळतात. शेतकरी पिकांचे अवशेष साफ करण्यासाठी आणि पुन्हा पेरणीसाठी त्यांचे शेत तयार करण्यासाठी भुसकट जाळतात. पेंढा जाळल्यामुळे निघणाऱ्या धुरात पार्टिक्युलेट मॅटर (पीएम), कार्बन मोनॉक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड यांसारखे हानिकारक प्रदूषक असतात. याचा स्थानिक आणि प्रादेशिक हवामानावर लक्षणीय परिणाम होतो.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement