Modi's Energy, Vision Inspires Us: 'पीएम मोदी हे अप्रतिम व्यक्ती आहेत, त्यांची ऊर्जा, दृष्टी आम्हाला प्रेरणा देते'; DP World च्या सीईओने केले कौतुक, भारतात गुंतवणुकीची घोषणा

आम्ही जवळपास 2.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे आणि आम्ही या प्रकल्पांमध्ये पुढील 3 वर्षांत आणखी गुंतवणूक करणार आहोत.’

Sultan Ahmed Bin Sulayem and PM Narendra Modi

संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाहयान आज अहमदाबाद येथे पोहोचले. येथे ते व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमध्ये सहभागी होत आहेत. या समिटमध्ये दुबईच्या बहुराष्ट्रीय लॉजिस्टिक कंपनी डीपी वर्ल्डचे ग्रुप चेअरमन आणि सीईओ सुलतान अहमद बिन सुलेम (Sultan Ahmed Bin Sulayem) हे देखील सहभागी होणार आहेत. सुलतान अहमद बिन सुलेम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदींचे भरभरून कौतुक केले. ते म्हणाले, ‘ही एक उत्कृष्ट बैठक होती. पीएम मोदी हे अप्रतिम व्यक्ती आहेत. त्यांची ऊर्जा, दृष्टी आम्हाला प्रेरणा देते. आम्ही आमच्या गुंतवणुकीबद्दल आणि भारतामधील विस्ताराबद्दल चर्चा केली. आम्ही औद्योगिक जमीन संपादन करत आहोत. आम्ही भारतात विविध क्षेत्रात उत्पादनात गुंतवणूक करू.’

गुंतवणुकीबद्दल ते म्हणाले, ‘आम्ही भारतासाठी वचनबद्ध आहोत. आम्ही जवळपास 2.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे आणि आम्ही या प्रकल्पांमध्ये पुढील 3 वर्षांत आणखी गुंतवणूक करणार आहोत.’ (हेही वाचा: Adani समूहाचा शेअर दरात मोठी वाढ, तेजीने गुंतवणूकदारांमध्ये उत्साह)