Miss World 2025: तेलंगणामध्ये भारतीय महिलांनी धुतले मिस वर्ल्ड स्पर्धकांचे पाय; व्हिडीओ व्हायरल, मंत्री जी किशन रेड्डी यांची टीका (Video)

केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी म्हणाले की, तेलंगणा काँग्रेस सरकारने गुलामगिरीचे धक्कादायक प्रदर्शन करत स्थानिक महिलांना मिस वर्ल्ड स्पर्धकांचे पाय धुवायला आणि पुसायला लावले. हे एक अपमानास्पद कृत्य आहे.

तेलंगणामध्ये भारतीय महिलांनी धुतले मिस वर्ल्ड स्पर्धकांचे पाय

यंदा तेलंगणामध्ये मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धा आयोजित करण्यात अली आहे. यावेळी भारतीय महिलांनी मिस वर्ल्ड स्पर्धकांचे पाय धुताल्याचा व्हिडीओ समोर आला असून, यावरून वाद निर्माण झाला आहे. तेलंगणा सरकारच्या या निर्णयावर केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी याला अपमानास्पद कृत्य आणि ते वसाहतवादी काळातील मानसिकतेचे प्रतिबिंब असल्याचे म्हटले. मिस वर्ल्ड 2025 स्पर्धा 10 मे रोजी हैदराबादमध्ये एका भव्य समारंभाने सुरू झाली. मिस वर्ल्ड स्पर्धेच्या 72 वा आवृत्तीचा समारोप 31 मे 2025 रोजी होणार आहे. यावेळी काही स्पर्धक तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यातील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ असलेल्या 800 वर्ष जुन्या रामप्पा मंदिराच्या सांस्कृतिक सहलीला गेले होते. त्यावेळी भारतीय महिलांनी मिस वर्ल्ड स्पर्धकांचे पाय धुतले. यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी म्हणाले की, तेलंगणा काँग्रेस सरकारने गुलामगिरीचे धक्कादायक प्रदर्शन करत स्थानिक महिलांना मिस वर्ल्ड स्पर्धकांचे पाय धुवायला आणि पुसायला लावले. हे एक अपमानास्पद कृत्य आहे.

ते पुढे म्हणाले की, मिस वर्ल्डच्या मंचाने स्पर्धकांना आपली भारतीय संस्कृती आणि आपला आदरातिथ्य दाखवण्याची एक उत्तम संधी दिली होती परंतु तेलंगणा सरकारने ही संधी वाया घालवली. यामुळे आपल्या महिलांचा स्वाभिमान दुखावला गेला आहे आणि भारतीय जनता पक्ष काँग्रेस सरकारच्या कृतीचा तीव्र निषेध करतो. (हेही वाचा: Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल)

तेलंगणामध्ये भारतीय महिलांनी धुतले मिस वर्ल्ड स्पर्धकांचे पाय:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement