Mira Road Metro Slab Collapses: मिरा रोडमध्ये मेट्रोच्या कामादरम्यान स्लॅबचा भाग कोसळला, शाळकरी मुलांची व्हॅन थोडक्यात बचावली

मिरा रोड पूर्वेकडील मिरा-भाईंदर रोडवर तुंगा हॉस्पिटलजवळ मेट्रो ९ च्या बांधकामादरम्यान स्लॅबचा एक भाग अचानक खाली कोसळला. याच वेळी खालून जाणाऱ्या एका स्कूल व्हॅनवर ढिगारा पडल्याने वाहनाचे नुकसान झाले, मात्र सुदैवाने सर्व मुले सुरक्षित बचावली आहेत.

मिरा-भाईंदर शहरात मेट्रोच्या कामादरम्यान पुन्हा एकदा सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. मिरा रोड पूर्व येथील मिरा-भाईंदर रोडवर तुंगा आणि दीपक हॉस्पिटलजवळ मेट्रो ९ च्या कामादरम्यान स्लॅबचा एक भाग अचानक रस्त्यावर कोसळला. या घटनेच्या वेळी रस्त्यावरून शाळकरी मुलांना घेऊन जाणारी एक स्कूल व्हॅन जात होती. स्लॅबचा काही भाग या वाहनावर आदळल्याने व्हॅनचे किरकोळ नुकसान झाले, परंतु कोणतीही जीवितहानी न झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement