Massive Fire Breaks Out at Kheda: प्लास्टिक कारखान्याला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल; गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील घटना
गुजरात राज्यातील खेडा जिल्ह्यात गोबलेज गावात असलेल्या एका प्लॅस्टिक कंपनीला मोठी आग लागली आहे. भीषण आगीने रौद्र रुप धारण केले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या आणि जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.
गुजरात राज्यातील खेडा जिल्ह्यात गोबलेज गावात असलेल्या एका प्लॅस्टिक कंपनीला मोठी आग लागली आहे. भीषण आगीने रौद्र रुप धारण केले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या आणि जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. कारखान्यात प्लॅस्टीकचे प्रक्रिया केलेले आणि कच्ची सामग्री अधिक असल्याने आग आणखी भडकत आहे.
अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरु झाले आहे. या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, आगीचे रौद्र रुप पाहता मोठी वित्त हानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वृत्तसंस्था एएनआयने या घटनेचा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवर अपलोड केला आहे. (हेही वाचा, Assam-Guwahati Accident: असमच्या गुवाहटीमध्ये भीषण अपघात, सात जणांचा मृत्यू अनेक जखमी)
ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement