Man Gets 7.66 Crore Bill For Auto Ride: व्यक्तीने अवघ्या 62 रुपयांमध्ये बुक केली ऑटो राइड; Uber ने दिले 7.66 कोटींचे बिल, पोस्ट व्हायरल
उबेरचा नियमित ग्राहक दीपक टेंगुरिया याने उबेर इंडिया ॲप वापरून केवळ 62 रुपयांमध्ये ऑटो राइड बुक केली होती, मात्र दीपक त्याच्या गंतव्यस्थानी पोहोचल्यावर त्याला 7.66 कोटी रुपयांचे बिल आले.
Man Gets 7.66 Crore Bill For Auto Ride: भारतामधील अनेक शहरांतील लोक उबेर आणि ओला वापरून प्रवास करतात. यामुळे वेळेत आणि कमी पैशात त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यास मदत होते. आता नोएडामधून उबेर प्रवासासंबंधी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये तरुणाला उबेरने प्रवास करणे चंद्रावर जाण्याइतके महाग पडले आहे. एका उबेर ग्राहकाला शुक्रवारी सकाळी नेहमीच्या ऑटो राईडनंतर 7.66 कोटी रुपयांचे बिल आले आहे. उबेरचा नियमित ग्राहक दीपक टेंगुरिया याने उबेर इंडिया ॲप वापरून केवळ 62 रुपयांमध्ये ऑटो राइड बुक केली होती, मात्र दीपक त्याच्या गंतव्यस्थानी पोहोचल्यावर त्याला 7.66 कोटी रुपयांचे बिल आले. याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून, ज्यामध्ये दीपकला 7,66,83,762 रुपयाने बिल आल्याचे दिसत आहे. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर लगेचच, उबेर इंडिया ग्राहक समर्थनाच्या अधिकृत X पृष्ठाने माफी मागितली आणि दावा केला की ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत. (हेही वाचा: Congress Tax Notice: काँग्रेसला आयकर विभागाची नवी नोटीस, भरावा लागणार 3500 कोटींचा कर)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)