गयामध्ये माथेफिरू चढला हाय-टेन्शन इलेक्ट्रिक पोलवर, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का (Watch Video)
स्थानिक पोलिसांनाही माहिती देण्यात आली पण पोलीस येण्यापूर्वीच तो माणूस खाली उतरला.
बिहारच्या गयामध्ये हाय टेंशन इलेक्ट्रिक पोलवर एक माथेफिरु तरुण चढला. हा तरुण सुमारे 100 फूट उंच खांबावर चढून 33 हजार व्होल्टच्या वायरला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. यानंतर तो व्यक्ती पोलवरुन उतरुन खाली उतरुन निघुन गेला. ही घटना रविवारी चेरकी पोलीस ठाण्यांतर्गत परसकलन गावात घडली. हा तरुण मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमले आणि त्यांनी त्यांना खाली येण्याची विनंती केली. स्थानिक पोलिसांनाही माहिती देण्यात आली पण पोलीस येण्यापूर्वीच तो माणूस खाली उतरला.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)