Man Attempts Suicide in Kerala HC: प्रेयसीने व्यक्त केली कुटुंबाकडे परतण्याची इच्छा; विवाहित प्रियकराने केरळ उच्च न्यायालयात कापले स्वतःचे मनगट

आपल्या गर्लफ्रेंडने तिच्या पालकांकडे परतण्याची इच्छा व्यक्त केल्याचे ऐकून या व्यक्तीने आपले मनगट कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Kerala High Court (PC - Wikimedia commons)

आज, सोमवारी 4 सप्टेंबर रोजी केरळ उच्च न्यायालयाच्या आवारात एका 31 वर्षीय विवाहित व्यक्तीने आपले मनगट कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी ही माहिती दिली. माहितीनुसार, विष्णू नावाच्या व्यक्तीने धारदार वस्तूने आपले मनगट कापले. त्रिशूर येथील रहिवासी असलेल्या या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले. विष्णू आणि एका महिलेचा समावेश असलेल्या हेबियस कॉर्पस याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू असताना ही घटना घडली. ही महिला या व्यक्तीची गर्लफ्रेंड असल्याचा दावा केला जात होता.

आपल्या गर्लफ्रेंडने तिच्या पालकांकडे परतण्याची इच्छा व्यक्त केल्याचे ऐकून या व्यक्तीने आपले मनगट कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायालयाच्या आवारात उपस्थित लोकांनी हस्तक्षेप करत त्याला रुग्णालयात नेले. (हेही वाचा: HC On Whatsapp Chat and Consensual Sex: केरळ उच्च न्यायालयाकडून बलात्काराच्या आरोपीला मिळाला जामीन; महिलेने पैसे घेऊन ठेवले होते लैंगिक संबंध)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now