Mamata Banerjee Sustains Major Injury: बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठी दुखापत; रुग्णालयात दाखल, TMC ने दिली माहिती (Photos)

छायाचित्रात ममता बॅनर्जी यांच्या डोक्यावर खोल जखम दिसत आहे, तसेच त्यातून रक्ताची धारही वाहताना दिसत आहे. ममता बॅनर्जी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

West Bengal CM Mamata Banerjee

Mamata Banerjee Sustains Major Injury: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जखमी झाल्या आहेत. तृणमूल काँग्रेसने छायाचित्रे जारी करून ही माहिती दिली आहे. टीएमसीने सांगितले की त्यांच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठी दुखापत झाली आहे. छायाचित्रात ममता बॅनर्जी यांच्या डोक्यावर खोल जखम दिसत आहे, तसेच त्यातून रक्ताची धारही वाहताना दिसत आहे. ममता बॅनर्जी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी यांना कोलकाता येथील सरकारी एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्या कशा जखमी झाल्या याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी काही कार्यक्रम करून परतत असताना त्यांच्यासोबत हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा: Army Team Assaulted Over Food Bill Payment: जेवणाच्या बिलावरून आर्मी मेजर आणि 16 जवानांवर पंजाबमधील ढाब्यावर हल्ला, मालकाला अटक)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Advertisement
Share Now
Advertisement