Maharana Pratap Jayanti 2024: महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त PM Modi यांनी अर्पण केली श्रद्धांजली
'भारतमातेचे महान सुपुत्र महाराणा प्रताप यांना त्यांच्या जयंतीनिमित्त शतशः प्रणाम.' या मेसेज सह त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (9 मे) महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त अभिवादन करत त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. 'भारतमातेचे महान सुपुत्र महाराणा प्रताप यांना त्यांच्या जयंतीनिमित्त शतशः प्रणाम.' या मेसेज सह त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. महाराणा प्रताप हे राष्ट्राचे नेतृत्व करणारे महान राजे मानले जातात. त्यांंना धैर्य, शौर्य आणि भक्तीचे प्रतीक म्हणून संबोधले जाते. त्यांनी आपल्या देशाचे आणि लोकांचे रक्षण करण्यासाठी अनेक युद्धांमध्ये आपले शौर्य दाखवले आहे. राजस्थानमधील मेवाड प्रदेशाचे हिंदू राजा महाराणा प्रताप हे राजपूत सिसोदिया वंशाचे सदस्य होते.
नरेंद्र मोदी यांची पोस्ट