Madhya Pradesh CM: मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर मोहन यादव यांनी मानले पंतप्रधान मोदी यांचे आभार
भाजपने छत्तीसगड राज्यातही मुख्यमंत्री पदासाठी नवा चेहरा दिला आहे. पक्षाने तेच सूत्र मध्यप्रदेश राज्यातही राबवलेले दिसते. दरम्यान, शिवराज सिंह हे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार राहिले होते.
मध्य प्रदेशमध्ये मोहन यादव यांची मुख्यमंत्रीपदी निवड ही करण्यात आली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री-नियुक्त मोहन यादव यांनी यावर प्रतिक्रीया देताना सांगितले की, "मला एवढी मोठी जबाबदारी दिल्याबद्दल मी पंतप्रधान मोदी, अमित शहा, जेपी नड्डा, शिवराज सिंह चौहान, व्हीडी शर्मा यांचे आभार मानतो. एवढी मोठी जबाबदारी फक्त भाजप पक्षच देऊ शकतो. माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता. मी राज्याचा विकास प्रवास पुढे नेणार आहे..." (हेही वाचा - Mohan Yadav New CM of MP: मोहन यादव मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री, शिवराज सिंह चौहाण यांचा पत्ता कट)
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)