Madhya Pradesh CM: मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर मोहन यादव यांनी मानले पंतप्रधान मोदी यांचे आभार

मोहन यादव हे मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री असतील. भाजपने छत्तीसगड राज्यातही मुख्यमंत्री पदासाठी नवा चेहरा दिला आहे. पक्षाने तेच सूत्र मध्यप्रदेश राज्यातही राबवलेले दिसते. दरम्यान, शिवराज सिंह हे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार राहिले होते.

Madhya Pradesh CM: मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी  निवड झाल्यानंतर मोहन यादव यांनी मानले पंतप्रधान मोदी यांचे आभार

मध्य प्रदेशमध्ये मोहन यादव यांची मुख्यमंत्रीपदी निवड ही करण्यात आली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री-नियुक्त मोहन यादव यांनी यावर प्रतिक्रीया देताना सांगितले की, "मला एवढी मोठी जबाबदारी दिल्याबद्दल मी पंतप्रधान मोदी, अमित शहा, जेपी नड्डा, शिवराज सिंह चौहान, व्हीडी शर्मा यांचे आभार मानतो. एवढी मोठी जबाबदारी फक्त भाजप पक्षच देऊ शकतो. माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता. मी राज्याचा विकास प्रवास पुढे नेणार आहे..." (हेही वाचा - Mohan Yadav New CM of MP: मोहन यादव मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री, शिवराज सिंह चौहाण यांचा पत्ता कट)

पाहा व्हिडिओ -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 11, 2023 05:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).