Ludhiana Fire: लुधियानात महामार्गावर उलटलेल्या तेलाच्या टँकरला भीषण आग, टायर फुटल्याने झाला अपघात

पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून जीटी रोडवरील दोन्ही बाजूची वाहतूक थांबवली असून अग्निशमन दलाला पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पंजाबमधल्या लुधियानामध्ये एक भीषण अपघात झाला आहे. तेलाने भरलेला टँकर लुधियानाहून मंडी गोबिंदगडला जात होता. खन्ना येथील बसस्थानकासमोरील पुलावर आले असता अचानक टँकरचा टायर फुटल्याने टँकर पुलावरच उलटला. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून जीटी रोडवरील दोन्ही बाजूची वाहतूक थांबवली असून अग्निशमन दलाला पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now