Lok Sabha Security Breach: संसदेतील घुसखोराला खासदारांनी केली मारहाण; समोर आला व्हिडिओ (Watch)

खासदार हनुमान बेनिवाल यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, अनेक खासदारांनी या दोघांना धरले, त्यानंतर काही खासदारांनी त्यांची धुलाई केली. लोकसभा सभागृहात सुरक्षेसंबंधी घडलेल्या गंभीर चुकीनंतर या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे.

Lok Sabha Security Breach

बुधवारी (13 डिसेंबर) संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सुरक्षेतील मोठी त्रुटी समोर आली. लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून दोन व्यक्तींनी उडी मारली आणि मजल्यावर आले. या दोन व्यक्तींनी सोबत आणलेल्या वस्तूतून पिवळा धूर सोडत आंदोलन करण्यास सुरुवात केली. मात्र काही वेळातच दोन्ही हल्लेखोर पकडले गेले. यावेळी काही खासदारांनी त्यांना बेदम मारहाण केली. खासदारांनी हल्लेखोर सागर या व्यक्तीला केसांनी ओढले. यानंतर अनेक खासदारांनी मिळून त्यांना थप्पड मारली. राजस्थानचे खासदार हनुमान बेनिवाल यांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. याचा व्हिडिओ समोर आला आहे.

खासदार हनुमान बेनिवाल यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, अनेक खासदारांनी या दोघांना धरले, त्यानंतर काही खासदारांनी त्यांची धुलाई केली. लोकसभा सभागृहात सुरक्षेसंबंधी घडलेल्या गंभीर चुकीनंतर या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे. लोकसभा अध्यक्षांनी याबाबत सभागृहात माहिती देताना सांगितले की, आज घडलेली घटना आपल्या सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे आणि तीही गंभीर आहे. घडल्या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी केली जात आहे आणि त्यानुसार कारवाई केली जाईल. सर्वसमावेशक आढावा घेतला जाईल. (हेही वाचा: Lok Sabha Security Breach: लोकसभा सभागृहात सुरक्षा भंग, Smoke Attack करत कामकाजात अडथळा; चौघांना अटक)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now