Lok Sabha Election 2024: 'मला परमात्म्याने पाठवले आहे, तोच माझ्या ऊर्जेचा स्त्रोत'; PM Narendra Modi यांनी सांगितले त्यांचे न थकण्याचे रहस्य (Watch Video)
एका महिला टीव्ही पत्रकाराने पंतप्रधानांना त्यांच्या उर्जेचे, न थकण्याचे रहस्य विचारले, तेव्हा पीएम मोदींनी जे उत्तर दिले ते सध्या व्हायरल होत आहे.
Prime Minister's Viral Interview With Rubika Liyaquat: पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणूक 2024 साठी अनेक सभा, रोड शोज करत आहेत. ते अथकपणे, न थांबता भाजपकडून प्रचार करत आहेत. अशात जेव्हा एका महिला टीव्ही पत्रकाराने पंतप्रधानांना त्यांच्या उर्जेचे, न थकण्याचे रहस्य विचारले, तेव्हा पीएम मोदींनी जे उत्तर दिले ते सध्या व्हायरल होत आहे. रुबिका लियाकत हिच्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘जेव्हा माझी आई हयात होती तेव्हा मला वाटायचे की कदाचित माझा जन्म जैविक दृष्ट्या झाला असेल, पण आई गेल्यानंतर मी आता सर्व अनुभव एकत्र करून त्याकडे बघतो, आणि आता मला खात्री झाली आहे की मला परमात्म्याने पाठवले आहे.’
ते पुढे म्हणतात, ‘हे ऐकून लोक माझी चेष्टा करतील, पण मी ही ऊर्जा माझ्या शरीरातून जैविक दृष्ट्या मिळवू शकत नाही. देवाने मला ही ऊर्जा दिली आहे. कदाचित त्याला माझ्याकडून काही काम करवून घ्यायचे आहे. म्हणूनच तो मला ही शिस्त, चांगले हृदय, प्रेरणा आणि प्रयत्न करण्याची ताकद देत आहे. मी काही नाही, मी फक्त एक साधन आहे. म्हणूनच जेव्हा मी काही करतो तेव्हा मला वाटते की, कदाचित देवाला मी हे करावे असे वाटत असेल. म्हणूनच मला नाव आणि प्रसिद्धीची चिंता नाही. मी पूर्णपणे देवाला समर्पित आहे. मात्र, मला तो देव दिसत नाही, म्हणूनच मी पुजारी आणि भक्तही आहे. मी भारताच्या 140 कोटी देशवासियांना देव मानतो आणि ते माझे देव आहेत.’ (हेही वाचा: Arvind Kejriwal Death Threate: मुख्यमंत्री केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी देणारा अखेर अटकेत; मेट्रो स्थानकावर लिहिला होता धमकीचा संदेश)
पहा व्हिडिओ-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)