Land Allotment Case: भाजप नेते मनप्रीत सिंह बादल यांच्या अडचणीत वाढ, पंजाब व्हिजिलन्सने जमीन वाटप प्रकरणात लुक आऊट नोटीस केले जारी
पंजाब व्हिजिलन्स ब्युरोने भटिंडा येथील मालमत्ता खरेदीत अनियमितता केल्याचा आरोप केल्यानंतर राज्याचे माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते मनप्रीत सिंग बादल यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
पंजाब व्हिजिलन्स ब्युरोने भटिंडा येथील मालमत्ता खरेदीत अनियमितता केल्याचा आरोप केल्यानंतर राज्याचे माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते मनप्रीत सिंग बादल यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. पंजाब व्हिजिलन्स ब्युरोने या प्रकरणी मनप्रीत सिंग बादल यांच्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी केली आहे. म्हणजेच या नोटीसनंतर मनप्रीत सिंग बादल यापुढे देश सोडून जाऊ शकत नाहीत.
पंजाब व्हिजिलन्स ब्युरोने भटिंडा येथील मालमत्तेच्या खरेदीत अनियमिततेच्या आरोपाखाली भाजप नेते मनप्रीत सिंग बादल आणि इतर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 2021 मध्ये, माजी आमदार सरूप चंद सिंगला यांच्या तक्रारीवर कारवाई करत, ब्युरोने तपास सुरू केला आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला. मनप्रीतने यापूर्वीच भटिंडा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश राम कुमार सिंगला यांच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)