IPL Auction 2025 Live

LAC Row: अरुणाचल प्रदेशातील तवांगजवळ भारत-चीन सैनिकांमध्ये हिंसक चकमक; अनेक सैनिक जखमी

अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये चिनी सैनिकांनी एलएसी ओलांडून भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

अरुणाचल प्रदेशातील तवांगजवळ भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाल्याची घटना समोर आली आहे. या चकमकीत दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 9 डिसेंबरच्या रात्री घडली. अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये चिनी सैनिकांनी एलएसी ओलांडून भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला असल्याचे सूत्रांनी सांगितले. भारतीय लष्कराच्या जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर देत त्यांचा पाठलाग केला. जखमी झालेल्या चिनी सैनिकांची संख्या भारतीय सैनिकांपेक्षा जास्त आहे. सुमारे 300 सैनिकांसह चीन जोरदार तयारी करून आला होता, परंतु भारतही त्यांना चोख प्रत्युत्तर देईल याबाबत ते गाफील होते. आता या भागातील भारताच्या कमांडरने प्रदेशात शांतता पुनर्संचयित करण्यासाठी एक बैठकही घेतली.

2020 मध्ये, लडाखच्या गलवान खाटीमध्ये चिनी सैनिकांनी LAC ओलांडल्यावर भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाली. या हिंसक चकमकीत 40 भारतीय जवान शहीद झाले. गलवानमध्ये अजूनही दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. अशा परिस्थितीत चीनने पुन्हा एकदा चिथावणीखोर कारवाई केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)