Kerala Shocker: भारतीय लष्कराच्या जवानाचे कोल्लममध्ये कथितपणे अपहरण; केला हल्ला, पाठीवर रंगवली 'PFI' अशी अक्षरे (Watch Video)

त्या ठिकाणी त्याचा छळ केला आणि त्याच्या पाठीवर पेंटने पीएफआय लिहिले.

Indian Army jawan allegedly kidnapped

केरळमधील कोल्लम जिल्ह्यातून एका भारतीय लष्कराच्या जवानाचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या प्रतिबंधित संघटनेने हे अपहरण केले आहे. जवानाचे अपहरण करून कडककल येथील त्याच्या घराजवळील जंगलात त्याला नेल्यानंतर तिथे त्याच्यावर कथित हल्ला करण्यात आला. रविवारी, सहा जणांनी पिडीत जवानाला पकडले आणि जंगलात नेले. त्या ठिकाणी त्याचा छळ केला आणि त्याच्या पाठीवर पेंटने पीएफआय लिहिले. पाठीवर हिरव्या रंगात पीएफआय अशी अक्षरे कोरलेल्या जवानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, भारतीय लष्कराच्या जवानाचा टी-शर्ट मागून फाटलेला आहे आणि त्याच्या पाठीवर पीएफआय अक्षरे हिरव्या रंगात लिहिली आहेत. (हेही वाचा: Bihar Shocker: माणुसकीला काळीमा! पटना येथे 1500 रुपयांच्या कर्जासाठी दलील महिलेला विवस्त्र करून मारहाण; चेहऱ्यावर केली लघवी)