Kerala Boat Accident: केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील तनूरजवळ पर्यटकांची बोट उलटली; 15 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु
अनेक रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे जवान आणि स्वयंसेवकांच्या मदतीने बचावकार्य सुरू असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.
केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील तनूर (Tanur) भागातील ओट्टुमपुरमजवळ रविवारी (7 मे) संध्याकाळी एक पर्यटकांची हाउसबोट उलटली. या अपघातामध्ये बोटीतील मुलांसह 15 जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला याची पुष्टी करताना केरळचे मंत्री व्ही अब्दुरहमान यांनी सांगितले की, बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या 15 झाली आहे. पोलिसांनी सांगितले की, अपघातस्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बोटीवर सुमारे 40-50 प्रवासी होते, त्यापैकी 15 जणांचा मृत्यू झाला, तर जखमींना जवळच्या खाजगी आणि सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले.
अनेक रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे जवान आणि स्वयंसेवकांच्या मदतीने बचावकार्य सुरू असल्याची माहितीही पोलिसांनी दिली. अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नसून बुडालेली बोट किनाऱ्यावर आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. केरळचे पर्यटन मंत्री मोहम्मद रियास कोझिकोडहून घटनास्थळी रवाना झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (हेही वाचा: Uttar Pradesh Accident: मुरादाबादमध्ये भीषण अपघात; ट्रकने पिकअप व्हॅनला धडक दिल्याने 8 ठार, 15 जखमी)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)