Kedarnath Temple Viral Video: उत्तराखंडमधील बाबा केदारनाथच्या गर्भगृहात महिलेने उडवल्या नोटा; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर BKTC ने दिले चौकशीचे आदेश (Watch)

महत्वाचे म्हणजे तिथे उपस्थित असलेला पुजारीही महिलेला अडवताना किंवा याबाबत काही कारवाई करताना दिसत नाही.

Kedarnath Dham

उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिरात एका महिलेने नोटा उडवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साधारण 8 सेकंदाच्या व्हिडिओ क्लिपमध्ये कथितरित्या एक महिला उत्तराखंडमधील केदारनाथ धामच्या गर्भगृहात रोख रक्कम उडवताना दिसत आहे. यावेळी तेथे उपस्थित असलेले इतर भाविक प्रार्थना करत असलेलेही दिसत आहे. मंदिराच्या गर्भगृहातून सोने चोरीला गेल्याचे वृत्त आल्यानंतर काही दिवसांनी हा व्हिडिओ समोर आला आहे. कथित व्हिडिओमध्ये पांढरी साडी नेसलेली महिला मंदिराच्या गर्भगृहातील शिवलिंगावर नोटा फेकताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे तिथे उपस्थित असलेला पुजारीही महिलेला अडवताना किंवा याबाबत काही कारवाई करताना दिसत नाही. ही घटना उघडकीस आल्यानंतर बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीच्या (बीकेटीसी) अध्यक्षांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)