Karnataka: हातात चाकू घेऊन लोकांना धमकवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून पायात गोळी झाडून जायबंदी, कर्नाटकातील कलबुर्गी येथील घटना (Watch Video)

पोलिसांनी या माथेफिरुला लोकांना न धमकविण्याची आणि हातातील चाकू टाकून देण्याची वारंवार विनंती केली. परंतू, हा माथेफिरु ऐकण्याच्या मनस्थिती नव्हता. उलट त्याचा उद्दामपणा अधिकच वाढत होता. परिणामी पोलिसांनी संभाव्य धोका विचारात घेऊन आणि माथेफिरुला नियंणात आणण्यासाठी गोळीबार केला.

Kalaburagi

हातात चाकू घेऊन नागरिकांना धमकावणाऱ्या एका माथेफिरुला कर्नाटक पोलिसांनी चांगली अद्दल घडवली आहे. पोलिसांनी या माथेफिरुला लोकांना न धमकविण्याची आणि हातातील चाकू टाकून देण्याची वारंवार विनंती केली. परंतू, हा माथेफिरु ऐकण्याच्या मनस्थिती नव्हता. उलट त्याचा उद्दामपणा अधिकच वाढत होता. परिणामी पोलिसांनी संभाव्य धोका विचारात घेऊन आणि माथेफिरुला नियंणात आणण्यासाठी गोळीबार केला. त्याच्या पाया गोळी मारुन त्याला जायबंदी केले आणि पकडले. पोलिसांनी सदर इसमाला अटक केली असून, तो असे का वागला याबाबत तपास सुरु आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)