Karnataka: बेंगळुरूमध्ये शोरमाच्या नमुन्यांमध्ये आढळले बॅक्टेरिया व यीस्ट; FSSAI ने केली होती चाचणी, कारवाई सुरु

विभागाच्या अधिकृत अहवालानुसार, 10 जिल्ह्यांमधून गोळा केलेल्या 17 शोरमा नमुन्यांपैकी फक्त नऊ नमुने स्वच्छ आणि आरोग्यदायी असल्याचे आढळले, तर इतर आठ नमुने आरोग्यदायी नसल्याचे दिसून आले.

शोरमा

याआधी मुंबईतील ट्रॉम्बे भागात रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉलवरून खरेदी केलेला चिकन शोरमा खाल्ल्यानंतर 6 मे रोजी एका 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. आता कर्नाटमध्येही तपासणीमध्ये निकृष्ट दर्जाचे शोरमा आढळून आले आहेत. ब्रुहत बेंगळुरू महानगर पालिका (BBMP) आणि बेंगळुरू शहरी हद्दीतील हॉटेल्ससह 10 जिल्ह्यांमधून शोरमाचे नमुने गोळा केले, त्यापैकी अनेक निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळले आहेत. खाद्यपदार्थांमध्ये कृत्रिम रंगांच्या सर्रास वापरावर कडक कारवाई करत, अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) विभागाने शनिवारी शोरमा डिश विकणाऱ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सवर कारवाई केली. शोरमा तयार करताना अस्वच्छ पद्धतींबद्दल प्राधिकरणाला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्यानंतर शोरमाचे नमुने गोळा केले गेले.

विभागाच्या अधिकृत अहवालानुसार, 10 जिल्ह्यांमधून गोळा केलेल्या 17 शोरमा नमुन्यांपैकी फक्त नऊ नमुने स्वच्छ आणि आरोग्यदायी असल्याचे आढळले, तर इतर आठ नमुने आरोग्यदायी नसल्याचे दिसून आले. या 8 नमुन्यांमध्ये बॅक्टेरिया आणि यीस्टचे ट्रेस आढळले, जे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात. लॅबच्या अहवालाच्या आधारे, अशा हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सवर कारवाई सुरू केली आहे. (हेही वाचा: Boy Died After Eating Shawarma: चिकन शॉरमा खाल्ल्याने 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू, अनेकांना विषबाधा; मानखुर्द परिसरातील घटना)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)