Karnataka Election Results 2023: कर्नाटकमधील पराभवावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया, "आम्हाला परंपरा मोडता आली नाही"

कर्नाटकातील निवडणुकाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरता प्रसार माध्यामांशी संवाद साधला

Devendra Fadnavis | (PC -Twitter)

कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 (Karnataka Assembly Election 2023) चा निकाल आता अधिक स्पष्ट झाला असून काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे या ठिकाणी दिसत आहे. दरम्यान या निकालावर भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

"कर्नाटकात कुठलंच सरकार पुन्हा येत नाही. एखादा अपवाद सोडला तर तेथे दर पाच वर्षांनी सरकार बदलत असतं. यावेळी आम्ही ही परंपरा तोडू असं वाटलं होतं, पण तसं करू शकलो नाही. 2018 मध्ये आमच्या 106 जागा आल्या होत्या. त्यावेळी आम्हाला 36 टक्के मतं होती. आता आम्हाला 35.6 टक्के मतं मिळाली आहेत. म्हणजे अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी म्हणजे 0.4 टक्के मतं भाजपाचे कमी झालेत." असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement