Karnataka: माजी मुख्यमंत्री HD Kumaraswamy यांनी वीजचोरी करून घराला रोषणाई केल्याचा कॉंग्रेसचा आरोप; BESCOM ने दाखल केला गुन्हा

ESCOM च्या दक्षता शाखेने त्याच्या दक्षता पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा कलम 135 अंतर्गत (वीज चोरी) हा गुन्हा नोंदवला आहे.

HD Kumaraswamy | (Photo Credits: ANI)

काँग्रेसने मंगळवारी (14 नोव्हेंबर) कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएसचे प्रदेशाध्यक्ष एचडी कुमारस्वामी यांच्यावर दिवाळीच्या वेळी वीज चोरीचा आरोप केला. कुमारस्वामी यांनी त्यांच्या जेपी नगर येथील घराला सजावटीच्या दिव्यांनी उजळण्यासाठी चोरीची वीज वापरल्याचा कॉंग्रेसचा आरोप आहे. सत्ताधारी काँग्रेसनेही याबाबत 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. आता काँग्रेसच्या आरोपानंतर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्याविरोधात बेंगळुरू वीज पुरवठा कंपनीने (BESCOM) गुन्हा दाखल केला आहे.

ESCOM च्या दक्षता शाखेने त्याच्या दक्षता पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा कलम 135 अंतर्गत (वीज चोरी) हा गुन्हा नोंदवला आहे. आपल्यावरील आरोपांबाबत कुमारस्वामी म्हणाले, ही त्यांची चूक नसून, खासगी डेकोरेटरची आहे. त्याने जवळच्या विद्युत खांबावरून थेट कनेक्शन घेतले. मात्र, ही बाब आपल्याला समजताच आपण तात्काळ ते काढून घरातील मीटर बोर्डवरून वीज जोडणी दिली. कुमारस्वामी पुढे म्हणाले की, मला घडल्या प्रकाराबाबत खेद वाटतो. छोट्या मुद्द्याला मोठा मुद्दा बनवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now