Karnataka Accident: कर्नाटकमध्ये भीषण अपघात; भरधाव वेगाने जाणारी रुग्णवाहिका टोल प्लाझावर आदळली, पहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ (Watch)

रुग्णवाहिका चालकाने ओल्या रस्त्यावर ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी होऊन वाहन अपघाताचा बळी ठरल्याचे समजते.

Karnataka Accident (Photo Credit : ANI)

कर्नाटकमध्ये एक मोठा रस्ता अपघात समोर आला आहे. यामध्ये पावसामुळे ओल्या रस्त्यावर भरधाव वेगाने जाणारी रुग्णवाहिका टोल प्लाझा येथे अपघातग्रस्त झाली. रुग्णवाहिकेत एक रुग्ण आणि दोन परिचर होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर तालुका परिसरातील टोल बूथवर हा अपघात झाला. माध्यमांच्या वृत्तानुसार या अपघातात रुग्णवाहिकेतील तीन प्रवासी आणि चालक यांचा मृत्यू झाला असून, चार जण जखमी झाले आहे. मात्र मृत लोकांच्या संख्येबाबत अजून ठोस पुष्टी झाली नाही. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णवाहिका चालकाने ओल्या रस्त्यावर ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी होऊन वाहन अपघाताचा बळी ठरल्याचे समजते. या अपघाताचे अंगावर काटा आणणारे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement