Kanpur Molestation Case: दुचाकीवरुन आलेल्या तरुणांची तरुणीसोबत छेडछाड, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद (Video)
त्यानंतर त्यांनी तिचा दुपट्टा ओढला. यावेळी पाठिमागून येणाऱ्या इतर मुलींनीही हा घाणेरडा प्रकार पाहिला. या तरुणीच्या पाठीमागून येणाऱ्या तरुणींनाही या तरुणांनी अश्लील शेरेबाजी केल्याचे समजते.
कानपूर येथे दुचाकीवरुन आलेल्या तीन तरुणांनी एका तरुणीशी छेडछाड केल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळते की, परिसरातील एक तरुणी सायकल घेऊन पायी निघाली असता पाठिमागून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकी स्वारांनी या तरुणीची ओढणी खेचली आणि निघून गेले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणांनी आगोदर तिच्याशी अश्लिल आणि अर्वाच्च भाषेत टीप्पणी केली. त्यानंतर त्यांनी तिचा दुपट्टा ओढला. यावेळी पाठिमागून येणाऱ्या इतर मुलींनीही हा घाणेरडा प्रकार पाहिला. या तरुणीच्या पाठीमागून येणाऱ्या तरुणींनाही या तरुणांनी अश्लील शेरेबाजी केल्याचे समजते.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)