Kanpur: कानपूरमध्ये शेजारी महिलांचा एकमेकांच्या नवऱ्यावर बलात्काराचा आरोप

पुर्व वादातून कानपूरमध्ये दोन शेजारी - शेजारी राहणाऱ्या महिलांना एकमेंकांच्या पती विरोधात बलात्काराचा आरोप केला आहे.

Sexual-Assault

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कानपुरमध्ये (Kanpur) एक विचित्र घटना घडली असून या घटनेने पोलीस देखील हैराण झाले आहेत. कानपूरच्या संचेडीत राहणाऱ्या एका महिलेने शेजारच्या व्यक्तीवर बलात्काराचा (Kanpur Rape Case) आरोप केला होता. यानंतर संचेडी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत महिलेला वैद्यकीय तपासणी करत पुढील कारवाई करण्यास सुरुवात केली होती. पंरतू या घटनेला 48 तास ही पुर्ण होत नाही तोच आरोपीच्या पत्नीने आरोप करणाऱ्या महिलेच्या पतीवरच बलात्काराचा आरोप केला आहे. आता संचेडी पोलीस या प्रकरणाचा देखील तपास करत असून पुर्व वादामुळे दोन्ही कुटुंब एकमेंकावर असे आरोप करत असल्याचे सांगितले जात आहे.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now