Kannauj Teacher Viral Video: प्राथमिक शाळेत शिक्षकांचा वर्गातच रोमान्स; पत्नीने हिडन कॅमेरा लावून गुपित उघड केले, तपास सुरू

उत्तर प्रदेशातील कनौज येथील एका प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि शिक्षिकेचा वर्गातच रोमान्स करतानाचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. शिक्षकाच्या पत्नीने वर्गात हिडन कॅमेरा लावून हे कृत्य उघडकीस आणले असून, या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे.

Teacher Viral Video: उत्तर प्रदेशातील कनौज जिल्ह्यातून शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका सरकारी प्राथमिक शाळेत लहान विद्यार्थ्यांसमोरच शिक्षक आणि शिक्षिकेचा वर्गात रोमान्स सुरू असल्याचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, शिक्षण विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ चौकशी सुरू केली आहे.

पत्नीने हिडन कॅमेरा लावून उघड केले गुपित

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षकाच्या वर्तनावर त्याच्या पत्नीला बऱ्याच दिवसांपासून संशय होता. हा संशय खरा ठरवण्यासाठी पत्नीने थेट प्राथमिक शाळेच्या वर्गखोलीत गुप्तपणे एक हिडन कॅमेरा बसवला. या कॅमेऱ्यामध्ये तो शिक्षक वर्गातीलच एका महिला शिक्षिकेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत कैद झाला. वर्गात शिकत असलेल्या लहान मुलांसमोरच हे दोन्ही शिक्षक अशा कृत्यांमध्ये गुंतले असल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.

Share Now

Advertisement
Share Now
Advertisement