Jammu and Kashmir: जम्मू कश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी उधळला

भारतीय लष्कर आणि दहशतवादी यांच्यात आज पहाटे जोरदार चकमक झाली. जम्मू कश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांकडून घुसखोरीचा प्रयत्न सुरु असताना भारतीय जवानांनी त्यांना रोखले. या वेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. अखेर दहशतवाद्यांना माघार घ्यावी लागली.

Indian Army प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-PTI)

भारतीय लष्कर आणि दहशतवादी यांच्यात आज पहाटे जोरदार चकमक झाली. जम्मू कश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांकडून घुसखोरीचा प्रयत्न सुरु असताना भारतीय जवानांनी त्यांना रोखले. या वेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. अखेर दहशतवाद्यांना माघार घ्यावी लागली. त्यांचा मनसूबा जवानांनी उधळून लावला. पाकच्या दहशतवाद्यांनी क्वाडकॉप्टर उडविण्याचा प्रयत्न केला पण भारतीय जवानांनी आक्रमक पवित्रा घेत जोरदार प्रत्युत्तर दिले. ज्यामुळे दहशतवादी मागे फिरले, अशी माहिती वृत्तसंस्था एएनआयने आपल्या ट्विटरहँडलवर लष्कराच्या सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now