Jammu Accident Video: बस दरीत कोसळून आठ जण ठार, 20 जखमी; जम्मू कश्मीर येथील घटान
अमृतसरवरुन (Amritsar ) येणारी बस दरीत कोसळल्याने जम्मू-कश्मीरमध्ये ( Jammu and Kashmir) आठ जणांचा मृत्यू आणि आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार 20 जण जखमी झाले आहेत. बस पूलावरुन कोसळल्याने ही घटना घडली, असे पोलिसांनी म्हटले आहे.
अमृतसरवरुन (Amritsar ) येणारी बस दरीत कोसळल्याने जम्मू-कश्मीरमध्ये ( Jammu and Kashmir) आठ जणांचा मृत्यू आणि आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार 20 जण जखमी झाले आहेत. बस पूलावरुन कोसळल्याने ही घटना घडली, असे पोलिसांनी म्हटले आहे. बसचा अपघात घडलेले ठिकाण जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर जज्जर कोटली (Jajjar Kotli) भागाजवळ, रियासी (Reasi) जिल्ह्यातील कटरा येथून 15 किमी अंतरावर आहे.
वरिष्ठ पोलीस अधीक्षक चंदन कोहली यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, "आठ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि इतर 20 जण जखमी आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आले. जखमींवर जम्मूच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. (हेही वाचा, Mysuru Road Accident: म्हैसूरजवळील भीषण अपघातामध्ये 10 जणांचा मृत्यू; समोर आला धक्कादायक व्हिडीओ (Watch))
ट्विट
जम्मू कश्मीरमध्ये डोंगराळ आणि पर्वतीय भागातून रस्तेवाहतूक होत असल्याने अपघाताच्या घटना अनेकदा घडत असतात. खास करुन बस दरीत कोसळणे, दरड कोसळून रस्ते खचने, वाहने रस्त्यावरच मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकणे असे प्रकार घडत असतात.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)