Jacket vs Scarf: पीएम नरेंद्र मोदींचे रिसायकल प्लास्टिकपासून तयार केलेले जॅकेट, तर काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांचा 56 हजारांचा स्कार्फ, सोशल मिडियावर चर्चेत

पीएम मोदींनी परिधान केलेल्या जॅकेटची किंमत साधारण 2000 रुपये असल्याचे सांगितले जात आहे, तर खरगे यांनी लूई वीटॉन (Louis Vuitton) या कंपनीचा मफलर घातला होता, ज्याची किंमत 56 हजार रुपये इतकी आहे.

PM Narendra Modi and Mallikarjun Kharge

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनावर सुरू असलेल्या चर्चेत भाग घेतला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अर्थसंकल्पीय अभिभाषणावर सरकारने मांडलेल्या आभार प्रस्तावावर बोलण्यासाठी पंतप्रधान आले होते. यावेळी पीएम मोदींनी रिसायकल प्लॅस्टिक पासून तयार केलेले निळे जॅकेट परिधान केले होते. सध्या सर्वत्र याचीच चर्चा सुरु आहे. दुसरीकडे अजून एका गोष्टीची चर्चा सुरु आहे, ती म्हणजे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे मफलर.

पीएम मोदींनी परिधान केलेल्या जॅकेटची किंमत साधारण 2000 रुपये असल्याचे सांगितले जात आहे, तर खरगे यांनी लूई वीटॉन (Louis Vuitton) या कंपनीचा मफलर घातला होता, ज्याची किंमत 56 हजार रुपये इतकी आहे. भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी खरगे यांच्या मफलरकडे लक्ष वेधले, कारण खरगे यांनी रीसायकल प्लास्टिक सामग्रीपासून बनविलेले जाकीट परिधान केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. पूनावाला यांनी पीएम मोदींचे जॅकेट व खरगे यांच्या मफलरचे फोटो शेअर करत, दोन्ही गोष्टींची तुलना केली आहे व या आपल्या ट्वीटद्वारे त्यांनी खरगे यांच्यावर निशाणाही साधला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now