ITR Filing 2024: शेवटच्या दिवशी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सात कोटींहून अधिक आयटीआर भरले; Income Tax विभागाची माहिती

शेवटच्या दिवशी म्हणजे बुधवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सात कोटींहून अधिक रिटर्न भरले गेले आहेत. आयकर विभागाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर याबाबत माहिती दिली.

प्रतिकात्मक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

ITR Filing 2024: आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कमावलेल्या उत्पन्नासाठी प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी म्हणजे बुधवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सात कोटींहून अधिक रिटर्न भरले गेले आहेत. आयकर विभागाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर याबाबत माहिती दिली. विभागाने सांगितले की, ‘आतापर्यंत (31 जुलै) 7 कोटींहून अधिक आयटीआर दाखल झाले आहेत, त्यापैकी आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 50 लाखांहून अधिक आयटीआर दाखल झाले आहेत. आयटीआर फाइलिंग, कर भरणा आणि इतर संबंधित सेवांसाठी करदात्यांना मदत करण्यासाठी आमचा हेल्पडेस्क 24x7 कार्यरत आहे. ज्यांनी आर्थिक वर्षे 2024-25 साठी आयटीआर भरला नाही अशा सर्वांना आम्ही त्यांचे आयटीआर दाखल करण्याचे आवाहन करतो.’ (हेही वाचा: Infosys Tax Evasion Case: इन्फोसिस कंपनीला 32,000 कोटी रुपयांच्या कथित करचोरी प्रकरणी GST विभागाची नोटीस)

पहा पोस्ट-

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now