International Flights: नियोजित आंतरराष्ट्रीय विमान सेवा 27 मार्चपासून सुरु होणार; दोन वर्षांपासून होती बंद
यासंदर्भात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत
भारत सरकारने 27 मार्चपासून देशातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानांना उड्डाण करण्यास परवानगी दिली आहे. सरकारने म्हटले आहे की ही आंतरराष्ट्रीय उड्डाणे केवळ परदेशी उड्डाणांसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच चालतील. यासंदर्भात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यात म्हटले आहे की 23 मार्च 2020 रोजी सर्व नियोजित आंतरराष्ट्रीय व्यावसायिक उड्डाणे निलंबित करण्यात आली होती. याबाबतचे परिपत्रक 19 मार्च 2020 रोजी जारी करण्यात आले. यानंतर, 28 फेब्रुवारी 2022 रोजीच्या ताज्या परिपत्रकानुसार, भारतातून व्यावसायिक प्रवासी सेवा पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आल्या होत्या, त्या 27 मार्चपासून सुरु होत आहेत.