Instagram Influencer Salika Malik हिचा बाईक स्टंट सोशल मीडियावर व्हायरल, श्रीनगर वाहतूक पोलिसांकडून कारवाई
जम्मू आणि कश्मीरच्या श्रीनगर येथीन एका तरुणीचा बाईकवर स्टंट करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या तरुणीने या स्टंटचे व्हिडिओही इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. सलिका मलिक असे या तरुणीचे नाव असल्याचे समजते. 21-सेकंदाच्या व्हिडिओमध्ये बुरखा घातलेली सालिका बाईक स्टंट काढताना दिसते.
जम्मू आणि कश्मीरच्या श्रीनगर येथीन एका तरुणीचा बाईकवर स्टंट करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या तरुणीने या स्टंटचे व्हिडिओही इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. सलिका मलिक असे या तरुणीचे नाव असल्याचे समजते. 21-सेकंदाच्या व्हिडिओमध्ये बुरखा घातलेली सालिका बाईक स्टंट काढताना दिसते. ज्यामुळे तिचा आणि इतरांचा जीव धोक्यात येऊ शकतो असा दावा केला जात आहे. श्रीनगर ट्रॅफिक पोलिसांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेत मुलीला दंड ठोठावला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)