Indira Gandhi Death Anniversary: माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वाहिली आदरांजली (See Photos)

इंदिराजींचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी झाला होता. 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या सतवंत सिंग आणि बेअंत सिंग या दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी (Photo Credit-PTI)

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान तसेच 'आयर्न लेडी' अशी ओळख असणाऱ्या इंदिरा गांधी यांची आज पुण्यतिथी. इंदिराजींचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी झाला होता. 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या सतवंत सिंग आणि बेअंत सिंग या दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. दिल्लीतील एम्समध्ये घेऊन जात असताना वाटेतच त्यांचे निधन झाले. इंदिराजींचा राजकीय वारसा प्रथम त्यांचे ज्येष्ठ पुत्र राजीव गांधी यांनी पुढे नेला आणि आता त्यांच्याशी सोनिया गांधी आणि राहुल गांधी जोडले गेले आहेत. आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शक्तीस्थळावर त्यांना आदरांजली वाहिली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now