India's First City of Literature: केरळमधील Kozhikode ठरले भारतातील पहिले 'साहित्यिक शहर'; UNESCO च्या यादीत समाविष्ट
ऑक्टोबर 2023 मध्ये, कोझिकोडने युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क (UCCN) च्या साहित्य श्रेणीमध्ये स्थान मिळवले.
India's First City of Literature: समृद्ध सांस्कृतिक वारशासाठी प्रसिद्ध असलेल्या केरळमधील कोझिकोड हे शहर भारतातील पहिले साहित्यिक शहर म्हणून ओळखले गेले आहे. रविवारी युनेस्कोने अधिकृतपणे कोझिकोड हे भारताचे पहिले साहित्य शहर म्हणून घोषित केले. ऑक्टोबर 2023 मध्ये, कोझिकोडने युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क (UCCN) च्या साहित्य श्रेणीमध्ये स्थान मिळवले. राज्यमंत्री एमबी राजेश यांनी रविवारी एका अधिकृत कार्यक्रमात कोझिकोडच्या यशाची घोषणा केली. मंत्री म्हणाले की, कोझिकोडने कोलकातासारख्या समृद्ध सांस्कृतिक आणि साहित्यिक इतिहास असलेल्या शहराला पराभूत करून युनेस्कोकडून 'साहित्य शहर' ही पदवी मिळवली आहे. कोझिकोडमध्ये 500 हून अधिक ग्रंथालये आहेत.
कोझिकोड व्यतिरिक्त भारतातील मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरने संगीत श्रेणीत प्रतिष्ठित यादीत स्थान मिळवले. युनेस्कोकडून टॅग मिळालेल्या जगभरातील इतर शहरांमध्ये हस्तकला आणि लोककला श्रेणीत बुखारा, मीडिया आर्ट्स श्रेणीत कॅसाब्लांका, डिझाईन श्रेणीत चोंगकिंग, चित्रपट श्रेणीत काठमांडू यांचा समावेश आहे. (हेही वाचा: NEET Paper Leak: नीट पेपर फुटीविरोधात NSUI ची दिल्लीत निदर्शने; NDA सरकारवर केले गंभीर आरोप)
पहा पोस्ट-