India-Pakistan Conflict: भारताची पाकिस्तानवर आणखी एक कारवाई; 23 जूनपर्यंत बंद केले हवाई क्षेत्र

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने सांगितले की, पाकिस्तानी प्रवासी विमाने आणि लष्करी विमाने भारतीय हवाई क्षेत्रात प्रवेश करू शकणार नाहीत.

Flights प्रतिकात्मक प्रतिमा | (Photo Credit - X/ANI)

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने एक मोठा निर्णय घेतला होता आणि पाकिस्तानी विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. आता हा कालावधी 23 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानच्या चिथावणीखोर भूमिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने सांगितले की, पाकिस्तानी प्रवासी विमाने आणि लष्करी विमाने भारतीय हवाई क्षेत्रात प्रवेश करू शकणार नाहीत. शुक्रवारी विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या 'NOTAM' (विमानचालकांना सूचना) मध्ये याची अधिकृतपणे पुष्टी करण्यात आली. या हालचालीचा उद्देश केवळ पाकिस्तानी हवाई कारवायांना आळा घालणे नाही, तर भारत आता जमिनीवरून असो वा आकाशातून, कोणत्याही कृतीला जोरदार प्रत्युत्तर देईल असा थेट संदेश देणे आहे. (हेही वाचा: Acute Food Insecurity in Pakistan: पाकिस्तानमधील 1.1 कोटी लोकांना बसू शकतो तीव्र अन्न असुरक्षिततेचा फटका- FAO Report)

India-Pakistan Conflict:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement