Hyderabad Temple Attack: शमशाबाद येथे हनुमान मंदिरात नवग्रह मूर्तींची अज्ञात माथेफिरुंकडून तोडफोड (Watch Video)
रविवारी कॅनजात हिंदू मंदिरात खलिस्तानींकडून हल्ला करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता हैद्राबादमध्ये हनुमान मंदिरात नवग्रह मूर्तींची अज्ञात माथेफिरुंकडून तोडफोड झाल्याची घटना समोर आली आहे.
Hyderabad Temple Attack: तेलंगणातील एका घटनेत, अज्ञात हल्लेखोरांनी हैदराबादमधील हनुमान मंदिरात (Hanuman temple) तोडफोड केल्याचे समोर आले आहे. यात नवग्रह मूर्तींची (Navagraha idols) तोडफोड करण्यात आली. हैदराबादच्या शमशाबाद एअरपोर्ट कॉलनीत नवग्रहांच्या मूर्तींची तोडफोड केल्याचा व्हिडिओही ऑनलाइन समोर आला आहे. X (पूर्वीचे ट्विटर) वर या घटनेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. बातमी शेअर करणाऱ्या पत्रकाराने सांगितले की, मंदिराच्या पुजाऱ्याला सकाळी नवग्रहांच्या मूर्तीची तोडफोड झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर पूजाऱ्याने पोलिसांना कळवले तेव्हा ही घटना उघडकीस आली. (हेही वाचा:Mosquito: जीवाणूंच्या मदतीने डासांची वाढ येऊ शकते नियंत्रणात- Report )
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
लखनऊ सुपर जायंट्सचे मालक Sanjiv Goenka यांच्याकडून तिरुपती बालाजी मंदिरात 5 कोटींचे सोने दान (Video)
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Advertisement
Advertisement