Hyderabad: विजेच्या धक्क्याने बेशुद्ध होऊन कोसळली व्यक्ती; पोलीस हवालदाराने CPR देऊन वाचवले प्राण (Watch Video)

त्यानंतर शंकर यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन, व्यक्तीला सीपीआर दिली. त्यानंतर त्यांनी 108 रुग्णवाहिका बोलावून जखमीला रुग्णालयात हलवले.

Viral Video

हैद्राबादच्या बंजारा हिल्स येथे मंगळवारी एका पोलीस हवालदाराने एका व्यक्तीवर कार्डिओ पल्मोनरी रिसुसिटेशन (CPR) करून, त्याचे प्राण वाचवले. बंजारा हिल्स ट्रॅफिक पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले कॉन्स्टेबल ए शंकर हे बंजारा हिल्स रोड नं.1/7 येथे कर्तव्य बजावत असताना, त्यांना माहिती मिळाली की जीव्हीके हाऊसजवळ एका व्यक्तीला विजेचा धक्का बसला असून तो खाली कोसळला आहे.

त्यानंतर शंकर यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन, व्यक्तीला सीपीआर दिली. त्यानंतर त्यांनी 108 रुग्णवाहिका बोलावून जखमीला रुग्णालयात हलवले. शंकर यांच्या या कृतीमुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचले, असे पोलीस सहआयुक्त एव्ही रंगनाथ यांनी सांगितले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement