HP Bus Accident: सुंदरनगर-शिमला HRTC Bus चा अपघात; बचावकार्य सुरू
आज हिमाचल प्रदेश मध्ये एका प्रवासी बसला अपघात झाला आहे.
हिमाचल प्रदेश मध्ये HRTC bus चा अपघात झाला आहे. सुंदरनगर कडून शिमला कडे ही बस जात असताना कोसळली आहे. मंडी मध्ये रस्ता खचल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात आलं आहे. आज सकाळी झालेल्या या अपघातामध्ये चार प्रवासी गंभीर जखमी, तर 8 प्रवासी किरकोळ जखमी आहेत. जखमी प्रवाशांना रुग्णालयात हलवण्यात आले असल्याची माहिती हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन कडून देण्यात आली आहे. नक्की वाचा: Uttarakhand: रुद्रप्रयागमध्ये भीषण अपघात, कारवर दरड कोसळली, ढिगाऱ्याखाली दबून 5 जणांचा मृत्यू
पहा ट्वीट
VIDEO | An HRTC bus going from Sundernagar to Shimla met with an accident after the road underneath caved in at Mandi, Himachal Pradesh earlier today. More details are awaited.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)