Falaknuma Express Fire Video:तेलगंणातील फलकनुमा एक्स्प्रेसला अचानक लागली आग, तीन डब्यांनी घेतला पेट
फलकनुमा एक्स्प्रेसला आग लागली. एक्स्प्रेसच्या तीन डब्यांनी घेतीली पेट. कोणतीही जीवीत हानी झाली नाही.
Falaknuma Express Fire Video: हावडा-सिकंदराबाद फलकनुमा एक्स्प्रेसला शुक्रवारी सकाळी पगिडीपल्ली आणि बोम्मईपल्ली स्थानकांदरम्यान आग लागली. बोम्मैपल्ली आणि पागीडिपल्ली दरम्यान फलकनुमा एक्स्प्रेसच्या तीन डब्यांना आग लागली, त्यानंतर ती थांबवण्यात आली. दक्षिण रेल्वेचे सीएच अधिकारी यांनी सांगितले की, सर्व प्रवासी ट्रेनमधून उतरले, सुदैवाने त्यांना कोणतीही प्रकारची दुखापत झाली नाही अशी माहिती वृत्तसंस्थाना देण्यात आली आहे. ANI या संदर्भात व्हिडिओ पोस्ट केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)