Hooch Tragedy In Tamil Nadu: तामिळनाडूमध्ये दारू प्यायल्याने 10 जणांचा मृत्यू; CM MK Stalin यांनी दिले सीबी-सीआयडी तपासाचे आदेश

बळी गेलेले बहुतांश रोजंदारी मजूर होते. या सर्वांनी करुणापुरमच्या एका विक्रेत्याकडून दारू खरेदी केली होती. दारूच्या विषबाधेमुळे मृत्यू झाल्याची शक्यता आहे.

Representational Image (File Photo)

Hooch Tragedy In Tamil Nadu: तामिळनाडूतील कल्लाकुरिची (Kallakurichi) येथे विषारी दारू प्यायल्याने 10 जणांचा मृत्यू झाला आहे. कल्लाकुरिची टाउन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील करुणापुरम भागात 18 जून रोजी ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बळी गेलेले बहुतांश रोजंदारी मजूर होते. या सर्वांनी करुणापुरमच्या एका विक्रेत्याकडून दारू खरेदी केली होती. दारूच्या विषबाधेमुळे मृत्यू झाल्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या प्रकरणाची सीबी-सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जिल्हाधिकारी श्रावणकुमार जटवथ यांची बदली करण्यात आली आहे. एमएस प्रशांत यांची कल्लाकुरिची जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कल्लाकुरिचीचे एसपी समयसिंह मीना यांनाही निलंबित करण्यात आले आहे. रजत चतुर्वेदी यांची नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणी इतरही अनेक पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. (हेही वाचा: Baramulla Encounter: बारामुल्लामध्ये चकमकीत 2 दहशतवादी ठार; एक पोलीस कर्मचारी जखमी)

पहा पोस्ट- 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now