'स्त्रीचा हात पकडणे, वासनेच्या हेतूशिवाय तिला धमकावणे हा तिचा विनयभंग होऊ शकत नाही'- Kerala High Court चा निर्णय

विधाने आणि पुरावे तपासले असता, न्यायाधीशांच्या लक्षात आले की आरोपी पुरुषाचा त्या महिलेचा हात धरून तिला अयोग्यरीतीने धमकावण्याचा कोणताही हेतू नव्हता.

Court (Image - Pixabay)

केरळच्या एका न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय देत म्हटले की, केवळ महिलेचा हात पकडून तिला कोणत्याही वासनेच्या हेतूशिवाय धमकावणे हे भारतीय दंड संहिता (IPC) कलम 354 नुसार महिलेच्या विनयभंगाच्या गुन्हा ठरत नाही. केवळ पिडीत महिलेचा हात धरून तिला ठार मारेल अशी धमकी दिल्याने आयपीसीच्या कलम 354 नुसार गुन्हा दाखल होणार नाही. न्यायालयासमोरील प्रकरण 2013 मध्ये घडलेल्या एका घटनेशी संबंधित आहे. फिर्यादीनुसार, एक महिला मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेली असता आरोपीने तिचा हात पकडून तिला जीवे मारण्याची धमकी दिली.

आरोपीविरुद्ध दाखल केलेल्या फौजदारी खटल्यात असा आरोप आहे की, त्याने आयपीसीच्या कलम 354 (महिलेवर प्राणघातक हल्ला किंवा गुन्हेगारी बळजबरी करणे) आणि 506(1) (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा केला आहे. विधाने आणि पुरावे तपासले असता, न्यायाधीशांच्या लक्षात आले की आरोपी पुरुषाचा त्या महिलेचा हात धरून तिला अयोग्यरीतीने धमकावण्याचा कोणताही हेतू नव्हता. त्यामुळे न्यायालयाने आरोपीविरुद्ध आयपीसी कलम 354 अन्वये आरोप रद्द केले. मात्र आरोपीला आईपीसीच्या कलम 506 (1) अंतर्गत गुन्हेगारी धमकी दिल्याबद्दल दोषी ठरवले. (हेही वाचा: Blade Attack After Breakup: प्रेयसीने टाळल्याने 'ब्रेकअप'च्या तणावात तरूणाने अंगावर करून घेतल्या ब्लेडचे वार)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)