Accident Video: अहमदाबादमध्ये पुन्हा एक हिट अँड रनची घटना, भरधाव कारची तीन गाड्यांना धडक
शेला परिसरात भरधाव वेगात असलेल्या कारचा अपघात झाला, हा अपघात इतका गंभीर होता की, कारचे पुढील बोनेट तुटले. सुदैवाने कारमधील एअरबॅग उघडल्याने कार चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही.
अहमदाबादमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे. शहरातील शेला परिसरात भरधाव वेगाने येणाऱ्या कारने अन्य तीन कारला धडक दिली. अपघातानंतर कार चालक फरार झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात एक महिला किरकोळ जखमी झाली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेला परिसरात भरधाव वेगात असलेल्या कारचा अपघात झाला, हा अपघात इतका गंभीर होता की, कारचे पुढील बोनेट तुटले. सुदैवाने कारमधील एअरबॅग उघडल्याने कार चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही.चालक स्काय सिटी, शेला येथील फ्लोरीश बंगला क्रमांक 135 मध्ये राहत असून कार मनोज अग्रवाल यांच्या नावावर आहे. अपघातानंतर कार चालक फरार झाला.
पाहा व्हिडिओ -
'તથ્ય' 2.0 : અમદાવાદમાં વધુ એક હિટ એન્ડ રનની ઘટના, 100ની સ્પીડ પર આવતી કારે ત્રણ કારને મારી ટક્કર#Ahmedabad #AhmedabadAccident #Gujarat #BreakingNews #CCTV pic.twitter.com/YuJWr2gSpD
— Zee 24 Kalak (@Zee24Kalak) August 9, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 09, 2023 12:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

