His Intention Is To Harass Wife: कलकत्ता उच्च न्यायालयाचा निकाल- पत्नीविरोधात दाखल याचिका फेटाळली, जाणून घ्या न्यायालयाचे निरीक्षण

पत्नीने कौटुंबिक न्यायालयासमोर कलम 125 सीआरपीसी याचिका दाखल केली होती. त्यानंतर ही याचिका वर्धमान सोडून इतर कुठल्याची न्यायालयात हस्तांतरीत केली जावी अशी विनंती करणारी याचिका पतीने कलकत्ता उच्च न्यायालयाने याचिका दाखल केली.

Calcutta High Court

कलकत्ता उच्च न्यायालयाने अलीकडेच कलम 125 सीआरपीसी कार्यवाही हस्तांतरित करण्याची मागणी करणाऱ्या एका व्यक्तीची विनंती नाकारली आहे. या व्यक्तीच्या पत्नीने वर्धमान येथील कौटुंबिक न्यायालयात त्याच्याकडून नुकसान भरपाईची मागणी केली होती. आता पतीची विनंती नाकारताना न्यायमूर्ती शम्पा दत्त (पॉल) यांच्या खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले की, पतीच्या ही केस वर्धमान न्यायालय वगळता इतर कोणत्याही न्यायालयाकडे हस्तांतरित केली जावी, या विनंतीने हे दाखवून दिले की पत्नीला त्रास देणे हाच त्याचा हेतू होता.

पत्नीने कौटुंबिक न्यायालयासमोर कलम 125 सीआरपीसी याचिका दाखल केली होती. त्यानंतर ही याचिका वर्धमान सोडून इतर कुठल्याची न्यायालयात हस्तांतरीत केली जावी अशी विनंती करणारी याचिका पतीने कलकत्ता उच्च न्यायालयाने याचिका दाखल केली. नुकतेच या पतीच्या याचिकेवर न्यायालयाने सुनावणी केली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने याचिका दाखल करणाऱ्या व्यक्तीला खडे बोल सुनावले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now