Hike In LIC Employees Salary: एलआयसी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; मूळ वेतनात होणार 16% वाढ, सरकारने दिली मंजुरी- Reports

साधारण 30,000 पेन्शनधारकांनाही या वाढीचा फायदा होण्याची शक्यता आहे.

LIC (Photo Credits: Twitter)

Hike In LIC Employees Salary: देशातील सर्वात मोठी सरकारी जीवन विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) च्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. एलआयसी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. CNBC-TV18 ने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, या पगारवाढीमुळे 1 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 16 टक्क्यांनी वाढ होईल. साधारण 30,000 पेन्शनधारकांनाही या वाढीचा फायदा होण्याची शक्यता आहे. माहितीनुसार, या पगारवाढीमुळे वार्षिक 4000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च होणार आहे. ही पगारवाढ भत्त्यांसह ऑगस्ट 2022 पासून लागू होईल. (हेही वाचा: Essential Medicines Prices to Increase: सर्वसामान्यांच्या खिशाला झटका; 1 एप्रिलपासून पॅरासिटामॉलपासून ते अँटीबायोटिक्सपर्यंत 800 अत्यावश्यक औषधांच्या किंमती वाढणार)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)