Heatwave Data: भीषण उष्णतेचे तांडव सुरु; देशातील अनेक राज्यांमध्ये पारा 42 अंशांच्या पुढे, Nandyala येथे आज 43.7°C तापमानाची नोंद

हे तापमान 43.7°C इतके होते. नंदयाल हे आंध्र प्रदेशच्या कुर्नूल जिल्ह्यातील छोटे शहर आहे.

Heat Wave प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

Maximum Temperature: भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) जाहीर केले आहे की भारतात यावर्षी (एप्रिल ते जून) सरासरीपेक्षा जास्त उन्हाळ्याचे दिवस दिसतील. देशातील बहुतांश भागात तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. उष्णतेचा सर्वाधिक परिणाम दक्षिणेकडील भाग, मध्य भारत, पूर्व भारत आणि उत्तर-पश्चिम मैदानावर होईल, असा अंदाज आहे. याचाच अर्थ देशातील मैदानी भाग यंदा दरवर्षीपेक्षा जास्त उष्ण असणार आहेत. भारतीय हवामान विभागाने आज, 5 एप्रिल रोजी 42°C पेक्षा जास्त तापमानाची नोंद झालेल्या ठिकाणांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये नंदयाल (Nandyal) येथे सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. हे तापमान 43.7°C इतके होते. नंदयाल हे आंध्र प्रदेशच्या कुर्नूल जिल्ह्यातील छोटे शहर आहे. कुर्नूलमध्ये 43.5 अंश सेल्सिअस आणि सोलापूर व अनंतपूरमध्ये 43.1 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. साधारणत: एप्रिलमध्ये उष्णतेची लाट फक्त 4 ते 8 दिवस टिकते. मात्र यावेळी देशातील 23 राज्यांमध्ये 10 ते 20 दिवस उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे. (हेही वाचा: Heatwave Guidelines By Health Ministry: उन्हाळा वाढतोय, उष्णतेची लाट येण्याची शक्यता, आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्वे जारी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)