HC On Wife Refusal Of Sex: 'पत्नीने पतीसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास नकार देणे ही क्रूरता', उच्च न्यायालयाने मंजूर केला घटस्फोट

उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, कोणत्याही शारीरिक अक्षमतेशिवाय किंवा वैध कारणाशिवाय लैंगिक संबंध ठेवण्यास नकार देणे हे मानसिक क्रौर्य ठरू शकते.

Court | (Photo credit: archived, edited, representative image)
HC On Wife Refusal Of Sex: मध्य प्रदेश हायकोर्टाने (Madhya Pradesh High Court) अलीकडेच सांगितले की, पत्नीने आपल्या पतीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणे म्हणजे मानसिक क्रूरता आहे आणि हे कारण पतीला हिंदू विवाह कायद्यानुसार घटस्फोट घेण्यास वैध आहे. या प्रकरणी न्यायमूर्ती शील नागू आणि न्यायमूर्ती विनय सराफ यांच्या खंडपीठाने भोपाळ येथील कौटुंबिक न्यायालयाचा निकाल रद्द केला. कौटुंबिक न्यायालयाच्या नोव्हेंबर 2014 च्या निकालानुसार, पत्नीने दीर्घकाळासाठी लैंगिक संबंध ठेवण्यास नकार देऊन आपल्याला मानसिक क्रूरता केली असा दावा करणाऱ्या पुरुषाला घटस्फोट देण्यास नकार दिला होता. उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, कोणत्याही शारीरिक अक्षमतेशिवाय किंवा वैध कारणाशिवाय लैंगिक संबंध ठेवण्यास नकार देणे हे मानसिक क्रौर्य ठरू शकते. (हेही वाचा: HC on Husband Chromosomes and Child Gender: मुलीला जन्म दिला म्हणून सासरच्यांकडून सुनेचा छळ, हायकोर्ट म्हणाले- 'जन्माला येणाऱ्या बाळाचे लिंग हे पुरुषाच्या गुणसूत्रावर अवलंबून असते')

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)