HC On No Sex After Marriage and Sec 498: 'विवाहानंतर शारीरिक संबंध न ठेवणे ही बाब कलम 498A अंतर्गत क्रूरता नाही'; Karnataka High Court चा निर्णय

न्यायालयाने म्हटले की, 'तक्रार किंवा सारांश आरोपपत्रात कलम 498A आयपीसी अंतर्गत क्रूरता निर्माण करणार्‍या कोणत्याही तथ्य/घटनेचे वर्णन केलेले नाही.'

कर्नाटक उच्च न्यायालय (Photo Credits: ANI)

कर्नाटक उच्च न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम 498-ए अंतर्गत पत्नीने तिच्या पतीविरुद्ध दाखल केलेली फौजदारी तक्रार रद्द केली आहे. या तक्रारीमध्ये पत्नीने म्हटले होते की, आध्यात्मिक व्हिडिओ पाहिल्यामुळे पतीने लग्नानंतर तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले नाहीत. ही बाब क्रूरतेच्या श्रेणीत येत असल्याचे पत्नीचे म्हणणे होते. आता लग्नाच्या 28 दिवसांनंतर पत्नीने पतीविरुद्ध दाखल केलेली याचिका न्यायालयाने रद्द केली आहे. न्यायालयाने म्हटले की, 'तक्रार किंवा सारांश आरोपपत्रात कलम 498A आयपीसी अंतर्गत क्रूरता निर्माण करणार्‍या कोणत्याही तथ्य/घटनेचे वर्णन केलेले नाही.' यासोबतच तक्रारदाराला (पत्नीला) कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटाचा हुकूम मंजूर केल्याची नोंद खंडपीठाने घेतली. त्यामुळे त्या आधारावर फौजदारी कार्यवाही चालू ठेवण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. जर कार्यवाही चालू ठेवण्यास परवानगी दिली तर ते छळ, कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर होईल, असे मत न्यायालयाने नोंदवले. महिलेचा पती ब्रह्मा कुमारींचा अनुयायी आहे. (हेही वाचा: SC on Theft In Train: रेल्वे प्रवास करताना प्रवाशांनी स्वतःच्या मालमत्तेचे रक्षण करावे; 18 वर्षांपूर्वीच्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)