HC On Married Woman-Rape and Marriage Promise: विवाहित महिला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन बलात्कार केल्याचा खटला चालवू शकत नाही; दिल्ली उच्च न्यायालयाचे मोठे निरीक्षण

या प्रकरणात एफआयआर दाखल करणाऱ्या विवाहित महिलेने आरोप केला आहे की, एका पुरुषाने लग्नाच्या खोट्या बहाण्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते.

Delhi High Court | (Photo Credits: PTI)

विवाहित महिलेवरील बलात्काराबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने एक मोठे निरीक्षण नोंदवले आहे. विवाहित महिलेला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन बलात्कार केल्याचा खटला चालवता येणार नाही असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने असेही नोंदवले की, अशा दोन प्रौढांमधील लैंगिक संबंधांना कायदेशीर संरक्षण उपलब्ध नाही, ज्यांचे आधीच इतर कोणाशी कायदेशीररित्या लग्न झाले आहे.

न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांनी सांगितले की, जर एखाद्या अविवाहित महिलेसोबत लग्नाच्या खोट्या बहाण्याने लैंगिक संबंध ठेवले गेले, तर तो बलात्काराचा गुन्हा ठरू शकतो. मात्र, ज्या महिलेचे आधीच कायदेशीर लग्न झाले आहे, ती महिला जर का इतर पुरुषासोबत लैंगिक संबंध ठेवत असेल तर, ती लग्नाच्या खोट्या सबबीखाली लैंगिक संबंधात प्रवृत्त केल्याचा दावा करू शकत नाही. त्यामुळे एखादी महिला ज्याच्यासोबत लग्न करण्याचा कायदेशीर अधिकार नाही (आधीच दुसऱ्या कोणाशी लग्न झाल्याने), अशा व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवत असेल तर तिला कलम 376 अंतर्गत संरक्षण उपलब्ध नसेल.

या प्रकरणात एफआयआर दाखल करणाऱ्या विवाहित महिलेने आरोप केला आहे की, एका पुरुषाने लग्नाच्या खोट्या बहाण्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. भारतीय दंड संहिता, 1860 च्या कलम 376, 323, 506, 509 आणि 427 अंतर्गत हा एफआयआर दाखल करण्यात आला होता. महिला आधीच विवाहित असून तिला एक मुलगी आहे आणि तिचा घटस्फोटाचा खटला न्यायालयात प्रलंबित आहे. (हेही वाचा: HC On Family Approved Consensual Relationship and Rape: कुटुंबाच्या मान्यतेने अनेक वर्षे संबंध असलेल्या महिलेशी लग्न हा बलात्कार नाही - कोर्ट)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now